मोबाईल अॅप व्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 12, 2020

मोबाईल अॅप व्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शनमोबाईल अॅप व्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड : दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची येथील विद्यार्थी आण्णा आप्पा नरळे याने पर्यंती ता.माण येथील शेतकऱ्यांना मोबाईल अॅप द्वारे वेगवेगळ्या कृषिविषयक समस्यांवर मार्गदर्शन केले.


कोरोना काळात सर्वच शाळा महाविद्यालये बंद असल्याने दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांना आपल्या गावातील.  शेतकऱ्यांना  कृषीविषयक माहिती देण्यासाठी कृषिदुत म्हणून कार्य करण्यास सांगण्यात आले होते.


पर्यंती येथील आण्णा आप्पा नरळे या कृषिदुताने ' फुले कृषिदर्शनी' या कृषिअॅपद्वारे विविध प्रात्यक्षिके, नविन वाणांची निवड व लागवड, पाण्याचे व खतांचे नियोजन,किड, कीटकनाशक व तणनाशक फवारणी, पिकांची काढणी व त्यानंतरच्या सर्व प्रोसेस तसेच मार्केटिंग याविषयी माहिती दिली.


यावेळी गावातील 'कृषिविषयक समस्या व संधी' यावर उपस्थित शेतकरीवर्गात चर्चा घडवुन आणण्यात आली. कृषिक्षेत्रातील प्लँटिकस्, मार्केट यार्ड, फुले, जल इत्यादी अॅपचीही माहिती करुन देण्यात आली. नरळे यांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करुन त्यांचे व दादासाहेब मोकाशी कृषी  महाविद्यालयाचे आभार मानले.


याकामी आण्णा नरळे यास दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. शिंदे, समन्वयक प्रो.व्ही.व्ही. माने, प्रोगॅम ऑफिसर एस.एम. काटे तसेच विषयतज्ञ प्रो.व्ही.टी. बागल, प्रो.घाडगे यांचे मार्गदर्शन मिळाले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

 

No comments:

Post a Comment

Advertise