Type Here to Get Search Results !

मराठी चित्रपट सृष्टीत ‘हे’ कलाकार कोरोना पॉझिटिव्ह



मराठी चित्रपट सृष्टीत ‘हे’ कलाकार कोरोना पॉझिटिव्ह


मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीनंतर आता मराठी चित्रपट सृष्टीत सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत चिंतेचे वातावरण आहे.


अभिनेता व निर्माता सुबोध भावे नंतर आता आणखीन सहा मराठी कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आहे. झी युवा वर सुरु झालेल्या सिंगिंग स्टार या सेलिब्रिटी रिअॅंलिटी शो मध्ये सहभागी झालेले अभिजीत केळकर व पुर्णिमा डे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

View this post on Instagram

...नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोना ची लागण झाली... माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी,खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती... डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली... त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे... माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत... तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत धन्यवाद...

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkarofficial) on

 


अभिजीतने या संदर्भात एक पोस्ट सुद्धा इन्स्टाग्राम वर शेअर केली आहे. तसेच याच सेटवरचे रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.  


तसेच या शोच्या सेटवरील 2 क्रू मेंबर्स सुद्धा कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे आता 10 सप्टेंबर पर्यंत शोचे शुटींग बंद असणार असल्याचे समजते आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies