Type Here to Get Search Results !

कोविड रूग्णालयासाठी धरणे व बोंबाबोंब आंदोलन संपन्न



कोविड रूग्णालयासाठी धरणे व बोंबाबोंब आंदोलन  संपन्न

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला :  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी म्हसवड येथे कोविड रुग्णालय सुरु करावे, या मागणीसाठी काल  (ता. २८) शहरामधील नागरिकांनी येथील सातारा-पंढरपूर रस्त्यालगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सुमारे दोन तास धरणे धरुन बोंबाबोंब आंदोलन केले.


तालुक्यामत कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यातील सर्वच कोरोना रुग्णालयात उपचारासाठी रुग्णास जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे म्हसवड शहर व परिसरातील 40 गावामधील बाधित रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. शासनाने म्हसवड येथे स्वतंत्र रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.  


परंतु, प्रशासनाकडून काहीच कार्यवाही केली जात नाही. याचा निषेध व्यक्त करीत येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह नागरिकांनी काल सकाळी दहा वाजता धरणे आंदोलन केले. सुमारे तीन तास हे आंदोलन सुरु होते.  


या आंदोलनात नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, नगरसेवक धनाजी माने, युवराज सूर्यवंशी, किशोर सोनवणे, राहूल मंगरुळे, विजय धट, बबन अब्दागिरे, कैलास भोरे, कांता ढाले, सोमा केवटे, नितीन कलढोणे, रामभाऊ नरळे, केशव कारंडे, दीपक बनगर, बाळू पिसे आदी सहभागी झाले होते.  


म्हसवड कोविड रुग्णालय सुरु करण्याबाबत प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसिलदार बाई माने, तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण कोडलकर, म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी आंदोलनकांशी चर्चा केली. तातडीने रुग्णालय सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies