Type Here to Get Search Results !

म्हसवड शहराला नियोजित कोव्हीड रुग्णालयासाठी पाच अत्याधुनिक व्हँटिलेटर मशीन बेड देणार : मंत्री विश्वजित कदम



म्हसवड शहराला नियोजित कोव्हीड रुग्णालयासाठी पाच अत्याधुनिक व्हँटिलेटर मशीन बेड देणार : मंत्री विश्वजित कदम 

माणदेश एक्सप्रेस न्यूज


म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड शहरात गेल्या आठ दिवसात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे रुग्णास स्थानिक पातळीवरील नियोजित कोव्हीड रुग्णालयासाठी पाच अत्याधुनिक व्हँटिलेटर मशीन बेड त्वरीत उपलब्ध करुन देत असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली. म्हसवड शहरास मंत्री  विश्वजित कदम यांनी धावती भेट दिली व येथील श्री सिध्दनाथ देवस्थानच्या दरवाजा बंद मंदीराचे बाहेरुन दर्शन घेतले.


म्हसवड शहरात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याने सर्वसामान्य म्हसवडकर जनतेतुन भिती व्यक्त  होत असतानाच राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी याची गंभीर दखल घेत येथील रुग्णांची हेळसांड होवु नये त्यांना म्हसवड येथेच चांगल्या रुग्ण सुविधा मिळाव्यात याकरीता एकट्या म्हसवड शहराकरीता पाच नव्या व्हँटिलेटर मशीन देण्याचे आश्वासन देत तात्काळ याची अंमलबजावणी करण्यासाठी चक्रे फिरवल्याने म्हसवडकर जनतेतुन समाधान व्यक्त होत आहे.


माण तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढत असतानाच एकट्या म्हसवड शहराने शंभरी ओलांडल्याने तालुक्यातील प्रशासन हडबडले आहे. अशातच दररोज वाढत जाणारे रुग्ण ठेवायचे कोठे असा प्रश्न आरोग्य व प्रशासनासमोर उभा ठाकला असतानाच मंत्री विश्वजीत कदम यांनी अचानक म्हसवड शहराला भेट दिली.


यावेळी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री. सिध्दनाथाचे बाहेरहुन दर्शन घेवुन मंत्री महोदय परतत असताना त्यांना शहरातील काही नागरीकांनी मंदिर परिसरातच गाठले यावेळी शहरातील आम्ही म्हसवडकर टिमचे कार्यकर्ते कैलास भोरे यांनी मंत्री कदम यांना शहरातील कोरोना स्थितीचा अहवाल मांडताना शहरात अद्यावत असे सुसज्ज रुग्णालय हवे असल्याचे सांगत कोरोना काळात शहरातील आम्ही म्हसवडकर टिम राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.  


तर शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील एका सध्या बंद असलेल्या सुसज्ज रुग्णालयात जर व्हँटीलेटरची सोय उपलब्ध झाल्यास येथील रुग्णांची सोय होणार असल्याचे सांगुन याबाबत श्री.कदम यांनी मदत करण्याची विनंती केली. आजवर नेहमीच म्हसवडकरांच्या गरजेला मंत्री कदम यांचे कुटुंबिय धावून आले आहे. त्याप्रमाणे आजही म्हसवडकरांची गरज ओळखुन श्री कदम यांनी तात्काळ जिल्हाधिकारी सातारा यांना फोन लावुन म्हसवड शहरासाठी मी आमच्या ट्रस्टच्या माध्यमातुन पाच नवीन व्हँटीलेटर देत असुन त्याबाबतचे तसे मागणीपत्र देण्याची सुचना केली.  


त्यामुळे म्हसवड शहराला भेडसावणारी व्हँटीलेटरची चिंता चुटकीसारखी सुटली असल्याचे मत आम्ही म्हसवडकर च्या टिम कडुन व्यक्त होत आहे. तर ना. कदम यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पुढील आठवड्यापासुन शहरात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत माजी नगरसेवक कैलास भोरे यांनी व्यक्त केले. यावेळी स.पो.नि. गणेश वाघमोडे उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies