मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी केले घंटानाद आंदोलन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 29, 2020

मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी केले घंटानाद आंदोलनमंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी केले घंटानाद आंदोलन


आटपाडी : भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक विभागाच्यावतीने राज्यातील सर्व मंदिरे, मस्जिद, बुद्धविहार सुरु आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्री. सिद्धनाथ मंदिरात जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले.

 


भाजपच्या आंदोलनाला भाविकांनीही उपस्थिती लावत समाधान व्यक्त केले, जनतेची जी भावना आहे तीच भाजप मांडत असून लॉकडाऊन देशभर उठवलेले असताना राज्य सरकार मात्र झोपेचे सोंग सोंग घेत आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हे घंटानाद आंदोलन असल्याचे यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.


गुढी पाडवा नाही, श्रीराम नवमी नाही, हनुमान जयंती नाही, महिलांनी वट पौर्णिमा घरातून साजरी केली. आषाढी एकादशीला विठ्ठलाचे मंदिर बंद, दहीहंडी नाही, सार्वजनिक गणपतीला बंदी घालण्यात आली. परंतु आता मात्र सर्वसामान्य भक्तांना देवदर्शनाची ओढ लागली असून राज्यातील मंदिर, मस्जिद, बुद्धविहार सुरु करावी यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले.यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, विलास काळेबाग यांच्यासह कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise