हायवेवर ट्रक अडवून दरोडा टाकणारे ५ दरोडेखोर अटकेत ; टेंभुर्णी पोलिसांची कारवाई - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 30, 2020

हायवेवर ट्रक अडवून दरोडा टाकणारे ५ दरोडेखोर अटकेत ; टेंभुर्णी पोलिसांची कारवाईहायवेवर ट्रक अडवून दरोडा टाकणारे ५ दरोडेखोर अटकेत ; टेंभुर्णी पोलिसांची कारवाई


टेंभूर्णी : सोलापूर-पुणे हायवे वर टेंभूर्णी ता.माढा, जि.सोलापूर येथे ट्रक  अडवून दरोडे टाकणाऱ्या ५ दरोडेखोरांच्या टोळीला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली.


याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि.३०/०८/२०२० रोजी रात्री १ च्या सुमारास वरवडे टोलनाक्या पासून टेंभ्रुर्णी बाजूस ०२ कि. मी. अंतरावर पुणे-सोलापूर हायवे रोडवर मालट्रक यु.पी.७०.जी.टी.७३५३ हा सांगोला येथुन डांळीब भरून घेवुन आणखीन डांळीब भरणे करीता मौजे अंकुभे येथील मार्केट यार्ड येथे येत असताना तो रस्ता चुकल्याने वरवडे टोल नाका येथे गेला.  


वरवडे टोल नाका येथुन वळून परत मार्के यार्डकडे येत असताना समोर थांबलेल्या कार चालकास रस्ता बरोबर आहे का? असे विचारले असता त्याने बरोबर आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी हा मालट्रक मध्ये येवून बसला व तो ट्रक चालू करून जात असताना सदर कारमधून चौघेजण उतरून मालट्रच्या दोन्ही बाजुने दोघे-दोघेजण येवुन मालट्रक मध्ये चढले व एक इसम त्यांच्या कारजवळ उभा होता.ट्रकमध्ये चढलेल्या चौघांनी फिर्यादी व जखमीं साक्षीदार यांना मारहाण करून जखमी केले व फिर्यादीच्या गळ्यास चाकू लावून त्याचे खिशातून ३८,०००/-रूपये व ५०००/-रू किमतीचा एम.आय. कंपनीचा मोबाईल असा एकूण ४३,०००/-रू कि.ऐवज जबरदस्तीने काढून घेवून कारमध्ये बसून निघून गेले.


याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे गु.०६/२० २० भादवि.क.३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे घटनास्थळास डॉ. विशाल हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा उपविभाग, करमाळा यांनी भेट दिली असून सदर गुन्हयाचे तपास कामी सुचना दिल्या.


याबाबत  पोलिसांनी गुन्हयातील आरोपीचा मिळालेल्या माहिती नुसार सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून आरोपी १) रोहन देविदास ढवळे वय २४ वर्षे, २) रणजित बलभिम ढवळे वय २३ वर्षे, ३) महादेव विठ्ठल ढवळे वय २४ वर्षे सर्व रा.दगड अकोले ता.माढा, व ४) सोहम विट्ठल मस्के वय २० वर्षे रा.शेवर ता.माढा, ५ सुरज तुकाराम महाडिक वय १९ वर्षे रा.मालेगाव ता.माढा यांना ताब्यात घेतले असून त्यांनी सदर गुह्हयाची कबुली दिली आहे.


त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेल्या दोन स्विप्ट कार १) नं. एम.एच.०४.ई.एफ.३६९३ व स्विप्ट कार २) नं. एम.एच.०४.डी.एफ,७५१७ हया जप्त करण्यात आलेल्या आहेत.  


सदर गुन्हयाचा तपास मनोज पाटील सो पोलीस अधिक्षक,सोलापूर ग्रामीण, अतुल झेंडे अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण व डॉ.विशाल हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise