म्हसवड शहरात कोरोनाचे २० नवे रुग्ण ; पुन्हा लॉकडाऊन नको जनतेचा सूर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, August 27, 2020

म्हसवड शहरात कोरोनाचे २० नवे रुग्ण ; पुन्हा लॉकडाऊन नको जनतेचा सूरम्हसवड शहरात कोरोनाचे २० नवे रुग्ण ; पुन्हा लॉकडाऊन नको जनतेचा सूर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड शहरात कोरोनाचे आज गुरुवारी रात्री 20 रुग्ण नव्याने सापडले आहेत.  त्यामुळे नागरीक व   प्रशासन हादरले असुन आता काय करायचे? असा प्रश्न प्रशासनाच्या समोर पडला आहे.  


तर नागरिक हवालदिल झाले असुन, सतत च्या जनता कर्फ्यू मुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. आता लॉकडाऊन नको असा जनतेचा सुर आहे. तर आता पुन्हा जनता कर्फ्यू करायचा का? अशी द्विधा अवस्था प्रशासनाची झाली आहे.


म्हसवड शहरात कोरोनाचे 18 रुग्ण सापडल्याने 23 ते 28 असा पाच दिवसांचा जनता कर्फ्यू केला आहे. आता पुन्हा 20 रुग्ण सापडले असल्याने आता हा लॉकडाऊनलोड वाढविणे गरजेचे आहे. असे मत ही व्यक्त होत आहे.  


दरम्यान दि. २६ रोजी आलेल्या कोरोना अहवालानुसार ६५ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष, २१ वर्षीय पुरुष, १३ वर्षीय मुलगा, ५६ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय युवक, ८१ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महिला, २८ वर्षीय महिला, २४ वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगा, ३१. वर्षीय पुरुष, २१ वर्षीय युवक, ७४ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय युवक, २० वर्षीय युवक आदी २० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.


यामध्ये भगवान गल्ली येथील १ जण, माळी गल्ली येथील २ जण, कोष्टी गल्ली ३ जण, सुतार गल्ली २ जण, मल्हारनगर येथील ५ जणांचा समावेश आहे तर उर्वरीत हे म्हसवड शहरातील इतर ठिकाणचे रहिवाशी आहेत.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise