दिघंची येथे एकाच दिवशी कोरोनाचे १९ नवे रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, August 28, 2020

दिघंची येथे एकाच दिवशी कोरोनाचे १९ नवे रुग्णदिघंची येथे एकाच दिवशी कोरोनाचे १९ नवे रुग्ण 

माणदेश एक्सप्रेस न्युज


दिघंची : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरु असून आज तालुक्यातील दिघंची गावी कोरोनाचे १९ नवे रुग्ण सापडल्याने दिघंची परीसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे .


आज नवीन आलेल्या रूग्णामध्ये दिघंची मधील एका व्यापारी कुटुंबांसह सोसायटी कर्मचारी यांचा नवीन रूग्णामध्ये समावेश आहे. तर गावामध्ये असणाऱ्या नामांकित पतसंस्थेतील कमर्चारी याला ही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.


दररोज नवीन सापडत असणाऱ्या रूग्णामुळे दिघंची परीसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांची गरज असेल तरच घराबाहेर पडा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टस्निंगचा वापर करा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होनराव यांनी नागरिकांना केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise