Type Here to Get Search Results !

शेटफळे येथील त्या मुलांचे v बस चालकांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह


शेटफळे येथील त्या मुलांचे v बस चालकांचे  कोरोना अहवाल निगेटिव्ह 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : शेटफळे ता. आटपाडी, जि.सांगली येथील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील आलेली तीन मुले व दोन बस चालक यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याने शेटफळकरांनी नि:श्वास सोडला आहे.
शेटफळे येथील बस चालक हे मजुरांना सोडण्यासाठी छत्तीसगड येथे गेले होते. यामध्ये एकूण १० बस चालक होते. यातील ३ चालकांना कोरोना झाला होता. तर शेटफळे येथील बस चालकाच्या संपर्कातील त्यांच्या दोन मुलांना कोरोनाचा लागण झाली असल्याची स्पष्ट झाले होते. या मुलांच्या संपर्कातील हायरिस्क मधील तीन मुलांचे स्वब तपासणीसाठी मिरज कोव्हीड येथील हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील आज त्या तीनही मुलांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याने कोरोनाची मोठी साखळी तुटल्याने शेटफळकरांनी नि:श्वास घेतला आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies