Type Here to Get Search Results !

नेलकरंजीजवळ भरघाव कारने ठोकरल्याने दोघे जखमी


नेलकरंजीजवळ भरघाव कारने ठोकरल्याने दोघे जखमी
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : नेलकरंजी ता.आटपाडी येथील माळी वस्तीजवळ भरघाव वेगाने जाणाऱ्या फोर्च्युनर कारने मोटारसायकल ला ठोकरल्याने दोनजण जखमी झाले. मोटारसायकलवरील सुनील हरिबा म्हारगुडे (वय २१ रा.दत्तनगर कर्नाळ रोड, सांगली) हा युवक गंभीर जखमी झाला. तर ओंकार माने (रा.पुणे) हा किरकोळ जखमी झाला. दिनांक २५ मे रोजी रात्री सात वाजता हा अपघात झाला.
याबाबत  सुनील म्हारगुडे यांनी आटपाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. ते आणि त्यांचा मित्र ओंकार मानेसह मोटारसायकलवरून सांगलीहून खरसुंडीला चालले होते. भिवघाटाच्या पुढे नेलकरंजीच्या माळी वस्तीजवळ खानापूर येथील गणेश अशोक भगत यांच्या कारने मोटारसायकलला जोरात धडक दिली.अपघातानंतर कार चालक न थांबता निघून गेला.
 या अपघातात सुनील म्हारगुडे याचा पाय मोडला आणि तो गंभीर जखमी झाला.तर ओंकार माने किरकोळ जखमी झाला. फिर्यादीनुसार आरोपी गणेश भगत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस हवालदार मल्याळकर करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies