Type Here to Get Search Results !

संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल




मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर एंजिओग्राफी करण्यात येणार असून गरज भासली तर, त्यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. हृदयरोग तज्ज्ञ अजित मेनन हे त्यांच्यावर एंजिओग्राफी करणार आहेत.राऊत यांची स्ट्रेस टेस्ट केल्यानंतर काही वेगळ्या रिडिंग्ज आल्यामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. राऊत यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जाणार असून फार काळजी करण्यासाठी असे काही नाही अशी माहिती सुनील राऊत यांनी दिली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात निर्माण झालेला पेच, आणि भाजप-शिवसेनेदरम्यान निर्माण झालेला तणाव यात संजय राऊत अथकपणे कार्यरत होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर मोठा ताण होता. राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाल्यापासून राऊत सतत पत्रकारांशी बोलत होते. सर्व आघाड्यांवर कार्यरत राहत राऊत यांनी शिवसेनेचे बाजू जोरकसपणे मांडण्याचे काम केले. या ताणतणावाच्या परिस्थितीचा मोठा ताण संजय राऊत यांच्यावर होता. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांना त्रास जाणवत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ अजित मेनन यांनी उपचार केले आहेत. मात्र, काल  पुन्हा त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

 दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी click करा








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies