Type Here to Get Search Results !

स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाआघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला : गाडी दिली पेटवून ; चार राऊंड केले फायर


माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन 
मोर्शी : अमरावती: जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाआघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर आज सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. या हल्ल्या मध्ये ते सुदैवाने बचावले असून त्याची चारचाकी गाडी मात्र जळून पूर्णपणे खाक झाली असून त्यांच्यावर चार राऊंड फायर केल्याचीही माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे भुयार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून, गावात तणाव आहे. 

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकार व पोलीस यंत्रणेचा तीव्र संताप  व्यक्त केला असून कार्यकर्त्यानी कोणताही अनुचित प्रकार न करता मतदान करून घ्यावे व आपला संताप मतपेटीतून व्यक्त करावा सायंकाळी ६ नंतर आपली भूमिका जाहीर करून असे आवाहन त्यांनी केले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies