अखेर सरकारने आपला शब्द पाळला..आणि महाराष्ट्रात १६ हजार ५00 विहीरी बांधल्या-राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर खोचक टीका - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 18, 2019

अखेर सरकारने आपला शब्द पाळला..आणि महाराष्ट्रात १६ हजार ५00 विहीरी बांधल्या-राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर खोचक टीका


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटर द्वारे ट्वीट खड्डे असलेल्या रस्त्यांचा फोटो शेअर करत खरच महारष्ट्र सरकारने आपला शब्द खरा केला व १६ हजार ५०० विहिरी बांधल्या अशी खोचक टीका केली.
नुकतीच महाराष्ट्र शासनाने राज्यात १६ हजार ५०० विहिरी बांधल्या अशी जाहिरीत केली होती. त्याचबरोबर सावर्जनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महारष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली होती. परंतु सध्या सगळ्याच मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचे  लक्ष वेधत खड्डे असलेला फोटो शेअर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर निशाना साधत एकाच दगडात दोन पक्षी मारले.

No comments:

Post a Comment

Advertise