Type Here to Get Search Results !

जळभावी येथे बाळूमामा भंडारा उत्सव संपन्न:

जळभावी येथे  बाळूमामा  भंडारा उत्सव संपन्न
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
माळशिरस/संजय हुलगे : जळभावी (ता.माळशिरस) येथे गेली अनेक वर्षापासून बाळुमामाचे भक्त  अजिनाथ चोरमले यांनी बाळूमामाच्या मठावर  गुडीपाडव्यानिमित्त  संत बाळूमामांचा भंडारा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी ७ ते १० यावेळेत  प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच संत बाळूमामांच्या पालखीची गावातून मिरवणुक काढण्यात आली. यावेळी पालखीसोबत ढोल, झांज, भगव्या पताका, तुलसीकलश तसेच आसपासच्या परिसरातील भजनी मंडळ विना टाळमृदंगाच्या गजरात  बाळूमामाचा जयघोष करीत बोला-बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं तसेच भजनी मंडळांनी ज्ञानोबा-तुकाराम अशाप्रकारे ठेका धरून  पाऊले नाचत वारकरी दंग झाली. तसेच गावांतून मिरवणूक  काढण्यात आली. सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. रात्री ७ ते १० या वेळेत अनेक गावातील ओविकार  मंडळींनी बाळूमामाच्या मठावर येऊन धनगरी ओव्या, मायाक्का ओवीकार मंडळ जळभावी, भोजलींग ओवीकर मंडळ जांभुळणी, बिरुदेव ओवीकर मंडळ काळेवाडी यांचा कार्यक्रम झाला.
रात्री १० नंतर एकनाथ महाराजांचा भारुड हरिभक्त परायण संदीपान महाराज सोनवलकर बीड यांचा सुश्राव्य असा भारुडाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी  सकाळी पूजा होमहवन झाल्यानंतर १० ते १२ या वेळेत ह.भ.प. मिराताई पाटील-बीडकर यांचे काल्याचे किर्तन सुश्राव्य असे  झाले. यावेळी कीर्तनासाठी साथ जळभावी येथील टाळकरी गोरडवाडी येथील गणेश महाराज  गोरड, लोंढे महाराज, दत्त पुजारी, सोमनाथ वाघमोडे, भांबुर्डीकर तदनंतर महाप्रसाद घेतल्यानंतर   कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी कार्यक्रमाला परिसरातील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies