Type Here to Get Search Results !

“कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?,” : निलेश राणे




“कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?,” : निलेश राणे


मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. मात्र त्याचवेळी त्यांनी भाजपाचाही खास आपल्या शैलीत समाचार घेतला होता. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

“वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?,” असं म्हणत भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांवर निशाणा साधला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies