Type Here to Get Search Results !

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या खोट्या बातम्या ; यावर सोनम कपूरचा संताप म्हणाली...




 बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या खोट्या बातम्या ; यावर सोनम कपूरचा संताप म्हणाली...



मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या खोट्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरत होत्या. त्यानंतर अनिल कपूरने स्वत: ट्विट करत याचा खुलासा केला. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून सोशल मीडियावर पसरणाऱ्या बातम्या फोल असल्याचे अनिल कपूरने ट्विटमध्ये सांगितले आहे. दरम्यान, यावर अनिल कपूरची लेक सोनम कपूर चांगलीच भडकली आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून चुकीचे वृत्त देणे भयानक असल्याचे म्हटले आहे. तसेच जबाबदारीने पत्रकारिता करण्याचा सल्लाही तिने दिला आहे.



सोनम कपूरने ट्विट केले की, "चुकीच्या बातम्या देणे भयानक आहे. मी लंडनमध्ये आहे आणि मी माझ्या वडिलांशी बोलण्यापूर्वीच काही मीडियातून चुकीची माहिती पसरवली जात आहे. कृपया पत्रकारीता जबाबदारीने करा."  तर अनिल कपूरने ट्विटमध्ये लिहिले की, "अफवांना पूर्णविराम देण्यासाठी सांगतो की, माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तुमच्या काळजी आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे."


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज









टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Unknown म्हणाले…
अनिल कपूर ग्रेट अभिनेता आहे

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies