Type Here to Get Search Results !

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील लेखकाची आत्महत्या ; सायबर फसवणूकीचा आणि ब्लॅकमेलचा शिकार झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप




 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील लेखकाची आत्महत्या ; सायबर फसवणूकीचा आणि ब्लॅकमेलचा शिकार झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप



मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील लेखक अभिषेक मकवानाने आत्महत्या केली आहे. राहत्या घरात तो मृत अवस्थेत आढळला. सदर घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या हाती सुसाइडनोट सापडली. आपण आर्थिक परिस्थितीचा सामना करत असल्याचं त्याने नोटच्या माध्यमातून सांगितले. मात्र तो सायबर फसवणूकीचा आणि ब्लॅकमेलचा शिकार झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला.



शिवाय अभिषेकला सतत फोनवरून धमक्या मिळत असल्याचा दावा देखील त्याच्या कुटुंबीयांनी केला. अभिषेकने घेतलेले कर्ज परत करण्यासाठी दबाव निर्माण केला जात होता, असं देखील त्याच्या भावाने सांगितले आहे. भावाच्या मृत्यूनंतर मी त्याचा मेल तपासून पाहिला त्याला वेग-वेगळ्या नंबरवरून फोन येत होते. 'इजी लोन' ऍपच्या माध्यमातून अभिषेकने कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या परतफेडीची रक्कम अधिक होती. शिवाय अभिषेकने ज्या ऍपद्वारे कर्ज घेतले होते तो ऍप ऑनलाइन सायबर घोटाळ्यात सामील असल्याचं अभिषेकच्या भावाने सांगितले आहे. 



अभिषेकला बांगलादेश, म्यानमार आणि उर्वरित भारतातील वेगवेगळ्या राज्यातून फोन येत होते.  याप्रकरणी  चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies