विराट कोहलीला तब्बल ७ वेळा बाद करणारा गोलंदाज - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 1, 2020

विराट कोहलीला तब्बल ७ वेळा बाद करणारा गोलंदाज


 

विराट कोहलीला तब्बल ७ वेळा बाद करणारा गोलंदाज  


शारजाह : जगातील कोणत्याही खेळपट्टीवर सहज धावा करणारा अफलातून फलंदाज, अशी विराट कोहलीची ओळख आहे. परंतु आयपीएलमध्ये  या गोलंदाजापुढे तो शरणागती पत्कारली असून त्याने विराटला तब्बल ७ वेळा बाद केले आहे. अशा कारनामा कोणत्याही गोलंदाजांना अद्याप करता आलेला नाही.  

सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने विराट कोहलीला ७ वेळा तंबूत धाडले आहे. याआधी विराटला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम आशिष नेहराच्या नावावर होता. त्याने विराटला ६ वेळा बाद केले आहे. याशिवाय संदीप शर्माने जहीर खानच्या एका विक्रमाशी बरोबरी साधली आहे. जहीरने धोनीला ७ वेळा बाद केले होते. संदीप शर्मा म्हणाला, मी शक्यतो विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. शारजाहच्या खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत होता. कारण खेळपट्टी ओली होती. यात आमची रणणिती यशस्वी ठरली. माझ्याकडे पहिले षटक फेकण्याची जबाबदारी होती. यातून मला इतर गोलंदाजांना कशी गोलंदाजी करावी हे सांगावे लागणार होते. ही जबाबदारी मी योग्य पद्धतीने हाताळली असल्याचे देखील संदीपने सांगितले.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise