कोळा येथील श्री लक्ष्मी देवीचे मंदिर उघडले : भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 16, 2020

कोळा येथील श्री लक्ष्मी देवीचे मंदिर उघडले : भाविकांमध्ये आनंदाचे वातावरणकोळा येथील श्री लक्ष्मी देवीचे मंदिर उघडले : भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण 

माणदेश एक्सप्रेस न्युज


कोळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले नऊ महिन्यांपासून बंद असलेले कोळा ता. सांगोला येथील ग्रामदेवता श्री. लक्ष्मी देवीचे मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर शासनाच्या निर्णयानुसार दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी लक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांनी सजावट केली होती. 


सकाळपासूनच भाविक भक्तांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश मधील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री. लक्ष्मी देवीचे दर्शन पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाले आहे. सकाळी दहा वाजता मानकरी व भाविक भक्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये चांगभलच्या गजरात मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्या नंतर देवीची दुपारती करण्यात आली. 
शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करत मंदिरामध्ये भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. लक्ष्मी देवी ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांच्या सुरक्षिततेसाठी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर मशीन बसविण्यात आली आहे. कोरोना मुळे कोळा गावची ग्रामदेवता लक्ष्मी देवीचे मंदिर बंद असल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत होते, तब्बल नऊ महिन्यानंतर मंदिर उघडल्याने भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत होते.

संकलन : विशाल मोरे 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise