कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने WHO चे प्रमुख स्वतः होम क्वारंटाइन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 2, 2020

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने WHO चे प्रमुख स्वतः होम क्वारंटाइन


 कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने WHO चे प्रमुख स्वतः होम क्वारंटाइन

नवी दिल्ली : जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूच्या संसर्गाच्या विळख्यात अगदी सर्वसामान्यांपासून ते व्हीव्हीआयपी मंडळी देखील सापडल्याचे दिसून आले आहे. अद्यापही करोनाचा संसर्ग जगभरात सुरूच आहे. आता, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांना देखील याचा फटका बसल्याचे दिसत आहे. कारण, करोनाबाधित व्यक्तीच्या ते संपर्कात आल्याने त्यांनी आता होम क्वारंटाइन झाले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटद्वार माहिती दिली आहे.


”मी करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व माझ्या कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे मी पुढील काही दिवसांसाठी होम क्वारंटाइनमध्ये असणार आहे व घरूनच काम करणार आहे.”

आपण सर्वांनी आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. असे केले तरच आपण करोना संसर्गाची साखळी तोडू शकू व करोनावर मात करू शकणार आहोत. तसेच, यामुळे आरोग्य प्रणालीचे रक्षणही करू शकणार आहोत. असंही टेड्रोस यांनी म्हटलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

No comments:

Post a Comment

Advertise