घरगुती गॅस सिलिंडर ऑथेंटिकेशन कोड राबविण्याचा निर्णय तूर्तास मागे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 2, 2020

घरगुती गॅस सिलिंडर ऑथेंटिकेशन कोड राबविण्याचा निर्णय तूर्तास मागे
 घरगुती गॅस सिलिंडर ऑथेंटिकेशन कोड राबविण्याचा निर्णय तूर्तास मागे 

मुंबई : तेल कंपन्यांनी १ नोव्हेंबर 2020 पासून देशभरात घरगुती गॅस सिलिंडर संबंधीत एक महत्वाचा डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड राबविण्याचे तूर्तास टाळण्यात आले आहे. जर कोणत्याही ग्राहकाचा मोबाईल नंबर गॅस कनेक्शनला जोडलेला नसल्यास टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण अद्याप 70 टक्के ग्राहक या सुविधेपासून लांब आहेत.  

या संदर्भात तेल कंपनीच्या एका वरिष्ठ आधिकाऱ्यांनी सांगितले की, डीएसी सुरुच राहणार आहे. मात्र, आवश्यक करण्यात आलेले नाही. कोणत्याही ग्राहकाचा मोबाईल नंबर गॅस कनेक्शनला जोडलेला नसल्यास त्याच्या मोबाईलवर डिएसी येणार नाही. या तांत्रिक अडचणींमुळे लाखो लोकांना सिलिंडर मिळणार नाही. यामुळे हा निर्णय सरकरट राबविण्याचा निर्णय तूर्तास मागे घेण्यात आला आहे. 


No comments:

Post a Comment

Advertise