Type Here to Get Search Results !

फिर्यादीच निघाला आरोपी : कलेढोण-मुंबई एसटी बसचा अपघात हा बस चालकाच्या चुकीमुळे

 



फिर्यादीच निघाला आरोपी :  कलेढोण-मुंबई एसटी बसचा अपघात हा बस चालकाच्या चुकीमुळे 





पनवेल : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ कलेढोण-मुंबई एसटी (क्रमांक एमएच १४ – बीटी ४६९७) बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर १३  जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कलेढोणहून सायंकाळच्या सुमारास मुंबईकडे निघालेल्या एसटी बसने पाठीमागून कंटेनरला धडक दिल्यानेच हा अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून, त्याने अपघात केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाला आहे. अपघातात जखमी झालेल्या ७ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.





दरम्यान बसचालक जगन्नाथ राऊत (४८) यांच्या फिर्यादीनुसार तालुका पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात ट्रेलरचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा अपघातात बसचालकाची चूक असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रेलरचालकाचा शोध घेतला असता त्याने बसचालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रेलरला पाठीमागून धडक दिली असल्याचे सांगितले.  





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies