Type Here to Get Search Results !

सदाभाऊ खोत यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट : आमदार म्हणून या १२ नावांचा उल्लेख




 सदाभाऊ खोत यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट : आमदार म्हणून या १२ नावांचा उल्लेख  




 मुंबई : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यात विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या 12 जागा रिक्त आहेत. या जागांमध्ये विज्ञान, साहित्य, कला, सहकार क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांना विधानपरिषदेवर संधी देण्याची परंपरा आहे. 






त्यानुसार, सदाभाऊ खोतांकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी नावे सुचवण्यात आली आहेत. यामध्ये मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांच्या नावाचा समावेश आहे. 






दरम्यान, राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी महाविकास आघाडीच्या सरकारने आधीच बारा जणांच्या नावांची राज्यपालांकडे शिफारस केली आहे. त्यासाठी घालून देण्यात आलेली पंधरा दिवसांची मुदत संपली तरीही राजभवनाकडून अद्याप कोणाताही निर्णय झालेला नाही. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies