रोहित पवार स्वार्थ, विश्वासघात, लबाडी, जातीयवादी विद्यापीठाचा विद्यार्थी : गोपीचंद पडळकरांची टीका - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 2, 2020

रोहित पवार स्वार्थ, विश्वासघात, लबाडी, जातीयवादी विद्यापीठाचा विद्यार्थी : गोपीचंद पडळकरांची टीकारोहित पवार स्वार्थ, विश्वासघात, लबाडी, जातीयवादी विद्यापीठाचा विद्यार्थी : गोपीचंद पडळकरांची टीका

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : सध्या राज्यामध्ये असंख्य प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. बेरोजगार लोक आपल्याला ट्वीटर द्वारे मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारत असताना तुम्ही ते प्रश्न सोडवायचे सोडून केंद्रातील प्रश्नाकडे बोट दाखवित असून ही दुटप्पी भूमिका बंद लोकानी कळू लागली असल्याने आपण राज्यातील प्रश्न सोडवावे अशी टीका भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर केली असून त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे.


सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत. लोकांचा रोजगार गेल्याने बेकारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत राष्ट्रवादी आमदार रोहित पवार हे बोलत नाहीत. परंतु केंद्रातील सरकारवर टीका मात्र करण्यात ते आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यामातून लोकांची विकासकामे करावीत. केंद्रीय नेतृत्वांना स्वार्थी बोलणे  हे हास्यास्पद आहे. केंद्रिय नेतृत्व लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत त्याच्याकडे लक्ष द्या असे आवाहन ही त्यांनी केले आहे.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise