देवरुख-म्हसवड‌‌-देवरुख बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा : शिवशंकर डमकले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 1, 2020

देवरुख-म्हसवड‌‌-देवरुख बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा : शिवशंकर डमकलेदेवरुख-म्हसवड‌‌-देवरुख बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा : शिवशंकर डमकले

माणदेश एक्सप्रेस टीम  
म्हसवड : माण तालुक्यातील प्रवाशांना कोकणात ये-जा करण्यासाठी देवरुख एसटी आगार तर्फे देवरुख -म्हसवड हि नवीन एसटी बस फेरी ३१ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली असून याचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवशंकर डमकले यांनी केले आहे.
देवरुख म्हसवड ही बस देवरुख येथून दुपारी साडेतीन वाजता निघेल आणि रात्री साडेनऊ वाजता म्हसवड मुक्कामी येईल. देवरुख येथून कराडला रात्री सव्वासात वाजता, वडूज येथे साडेआठ वाजता, दहिवडीस पाऊणे नऊ वाजता व म्हसवड ला साडेनऊ वाजता पोहचेल.  


म्हसवड येथून सकाळी सव्वासात वाजता सुटेल. म्हसवड, दहिवडी, वडूज, कराड मार्गे कोकणात जाण्यासाठी हि बस सेवा खूप प्रवाशांना खुपच फायदेशीर व सोयीची निश्चितच ठरणार आहे. रात्री सात नंतर कराड वरून दहिवडी, म्हसवड साठी बस नाही हि बस सुरु झाल्यामुळे कराड वरून प्रवाशांना रात्री सव्वा सात वाजता सुटणारी बस सोयीची होणार आहे.
हि बस सेवा सुरु करण्यासाठी म्हसवड व देवरुख (कोकण) भागातील प्रवाशांनी पाठपुरावा केला होता. विशेष बाब म्हणजे माण तालुका व कोकण या बस सेवेने जोडला जाणार असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेऊन बस नियमित सुरु राहण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन देवरुख एसटी आगार प्रमुख मृदुला जाधव यांनी केली आहे.  


प्रवाशांच्या सेवेसाठी देवरुख आगारा तर्फे देवरुख-म्हसवड बस सुरु करण्यात आली आहे. प्रवासी वर्गाने जास्त जास्त या गाडीचा लाभ घ्यावा

मृदुला जाधव

आगारप्रमुख, देवरुखकोकण मधून माणदेशात येणारे प्रवासी भरपूर असतात पण बस नाहीत. या साठी अनेक दिवसा पासून मागणी होती ती आज पूर्ण झाली.

निखिल कोलवनकर

देवरुख रहिवासी देवरुखची सोळजाई‌‌ देवी, मारळचे श्री मालेश्वर देवस्थान, विशालगडचे हजरत‌‌ रेहान मालिक दर्गाह, औंधची यमाई देवी, गोंदवल्याचे ब्रम्हचैतन्य‌ महाराज, म्हसवडचे सिद्धनाथ देवी जोगेश्वरी या सर्व देवस्थानसह कोकण-माणदेश जोडणारी अशी हि एसटी बस सेवा प्रवाशांना निश्चितच फायद्याची ठरणार आहे.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise