आवळाई येथील ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 16, 2020

आवळाई येथील ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेशआवळाई येथील ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेश

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : आटपाडी तालुक्यात सध्या सत्ताधारी शिवसेना पक्षात इनकमिंग सुरु असून आज आवळाई येथील ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

यामध्ये आवळाई ग्रामपंचायतीचे सदस्य नानासो रामचंद्र हेगडे, अरूण सदाशिव वाघमारे यांच्यासह गांधीनगर येथील कार्यकर्ते बापुराव हेगडे, गोविंद हेगडे, अंकुश हेगडे, दादासो जगन्नाथ वाघमारे, वैभव हेगडे, नानासो वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, सागर साळुंखे, अमोल केंगार यांचा पक्ष प्रवेश माजी जि.प. सदस्य व तानाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.


यावेळी युवा सेनचे तालुका प्रमुख पै. संतोष पुजारी, आवळाई गावचे लोकनियुक्त सरपंच बाबासो जाधव, युवा नेते नितिन साळुंखे, नवनाथ कदम, अंकुश साळुंखे, गणेश कदम उपस्थितीत होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसNo comments:

Post a Comment

Advertise