पदवीधर व शिक्षक मतदार निवडणूकीसाठी ‘वंचित’ चे उमेदवार जाहीर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 11, 2020

पदवीधर व शिक्षक मतदार निवडणूकीसाठी ‘वंचित’ चे उमेदवार जाहीरपदवीधर व शिक्षक मतदार निवडणूकीसाठी ‘वंचित’ चे उमेदवार जाहीर  

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : सध्या राज्यात पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली असून या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

पदवीधार मतदार संघातील औरंगाबाद मतदार संघासाठी प्रा. नागोराव कशिनाथ पांचाळ, पुणे पदवीधर मतदार संघासाठी प्रा. सोमनाथ जनार्धन साळुंखे व नागपूर मतदारसंघासाठी इंजि. राहुल महादेवराव वानखेडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

तर पुणे शिक्षक मतदार संघासाठी प्रा. सम्राट विजयसिंह शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या या निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे.

अद्याप ही महाविकास आघाडी कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. ज्यावेळी महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होतील त्यावेळी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise