कंगनाला आणखी एक धक्का : जावेद अख्तर यांनी ठोकला मानहानीचा दावा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 3, 2020

कंगनाला आणखी एक धक्का : जावेद अख्तर यांनी ठोकला मानहानीचा दावा
 कंगनाला आणखी एक धक्का : जावेद अख्तर यांनी ठोकला मानहानीचा दावा 
मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्य नेहमीच चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावतच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या कमी व्हायचे नावच घेत नाही. मागील महिन्यातच तिच्या विरोधात कर्नाटकमधील तुमकूर येथे एक आणि मुंबईत दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या. आता तिच्या विरोधात प्रसिद्ध गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. एका रिपोर्टनुसार, कंगनाच्या एका वक्तव्यावरून अख्तर यांनी हा दावा ठोकला आहे. कंगनाने दावा केला होता की, अख्तर यांनी घरी बोलवून धमकावत हृतिक रोशनला माफी मागण्यास सांगितले होते.

स्पॉटबॉय या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, जावेद अख्तर यांच्याशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की, कोणत्याही प्रकारची धमकी त्यांच्याकडून दिली गेली नव्हती. जावेद साहब स्वभावाने फार संवेदनशील आहेत. पण हे सगळे फार दिवसांपासून सुरू होते. आता जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. यात पुढे लिहिले आहे की, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि जावेद साहब मोठ्या लढाईसाठी तयार आहेत. न्यायालयाबाहेर सेटलमेंट करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नसल्यामुळे आता कंगनाच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise