IPL 2020 : Mi VS SRH : मुंबई इंडियनचे सनराईज हैदराबादला २०९ धावांचे तगडे आवाहन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, October 4, 2020

IPL 2020 : Mi VS SRH : मुंबई इंडियनचे सनराईज हैदराबादला २०९ धावांचे तगडे आवाहनIPL 2020 : Mi VS SRH : मुंबई इंडियनचे सनराईज हैदराबादला २०९ धावांचे तगडे आवाहन


शारजाह : येथे सुरु असलेल्या IPL 2020 : Mi VS SRH  या सामन्यात मुंबई इंडियनने सनराईज हैदराबादला २०९ धावांचे तगडे आवाहन दिले आहे.  


आजच्या सामन्यात रोहित शर्मानं  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानं MIचे चाहते निराश झाले. क्विंटन डी कॉकने फटकेबाजी करून ती निराशा दूर करण्याचा प्रयत्न केला आणि हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड यांनी अखेरच्या षटकांत धावा चोपल्या.

 


भुवनेश्वर कुमार आजच्या सामन्यात नसल्याने त्याचा मोठा फटका हैद्राबाद संघाला बसला. संदीप शर्मानं गोलंदाजीची सुरुवात केल्यावर रोहित शर्माने खणखणीत षटकार मारून स्वागत केल्यानंतरही संदीप शर्मानं पुढच्या चेंडूवर रोहितला यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी कॉक यांनी MIचा डाव रुळावर आणला. पण, सिद्धार्थ कौलनं यादवला माघारी पाठवले. यादवने 18 चेंडूंत 27 धावा केल्या.


क्विंटन एका बाजूनं फटकेबाजी करत होता. त्याला फॉर्मात असलेल्या इशान किशनची तोलामोलाची साथ मिळाली. क्विंटननं आपले अर्धशतक पूर्ण करताना संघाला शतकी पल्ला ओलांडून दिला. 14 व्या षटकात रशीद खान  क्विंटनला बाद केले. क्विंटन ३९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार मारून ६७ धावांवर माघारी परतला.


हार्दिक पांड्याने हि षटकार मारून सुरुवात केली पण, इशान किशन ३१ धावांवर माघारी परतला. मनीष पांडेने सीमारेषेनजीक त्याचा अप्रतिम झेल टिपला. हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड यांनी अखेरच्या षटकात पुन्हा फटकेबाजी केली, परंतु टी नटराजनच्या यॉर्करसमोर त्यांना आणखी फटकेबाजी करता आली नाही. हार्दिक 28 धावांवर त्रिफळाचीत झाला. कृणाल पांड्यानं अखेरच्या चार चेंडूंवर २० धावा चोपून मुंबई इंडियन्सला ५ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारून दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise