Type Here to Get Search Results !

IPL 2020 : KKR vs RCB कोलकाताचे रायडर्स ढेपाळले ; १९५ धावांचा पाठलाग करताना फक्त ११२ धावा केल्या



IPL 2020 : KKR vs RCB कोलकाताचे रायडर्स ढेपाळले ; १९५ धावांचा पाठलाग करताना फक्त ११२ धावा केल्या


शारजाह : IPL 2020 : KKR vs RCB सामन्यात कोलकाताचे रायडर्स ढेपाळले अन १९५ धावांचा पाठलाग करताना २० शतकात फक्त ११२ धावा करता आल्याने तब्बल ८२ धावांनी पराभव स्विकारावा लागला.


नाणेफेक जिंकून RCB नं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडीक्कल आणि आरोन फिंच यांनी RCB ला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्या. ८ व्या षटकात आंद्रे रसेलने KKR ला पहिले यश मिळवून दिले. त्यानं पडीक्कलचा त्रिफळा उडवला. पडीक्कल २३ चेंडूंत ३२ धावांवर माघारी परतला.  फिंचला KKR च्या कृष्णानं माघारी पाठवले. फिंच ३७ चेंडूंत ४७ धावांवर त्रिफळाचीत झाला. KKR च्या गोलंदाजांनी RCB च्या धावगतीला वेसण घातले होते. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या शारजाहच्या खेळपट्टीवर वरूण चक्रवर्थीने चार षटकांत २५ धावा दिल्या.

 


१६व्या षटकापासून विराट आणि एबी डिव्हिलियर्स यांनी गिअर बदलला. एबीनं १६ व्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचले आणि १८ धावा चोपल्या. १७ व्या षटकात पॅट कमिन्स गोलंदाजीला आला, पण एबीनं त्यालाही सोडलं नाही. त्या षटकात १९ धावांचा पाऊस पाडला. एबीनं २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमधील त्याचं हे ३६ वे अर्धशतक ठरलं. १८ व्या षटकात एबीनं १८ धावा चोपल्या. १९ वे षटक टाकणाऱ्या कृष्णानं RCB चा धावांचा वेग किंचित कमी करत १२ धावा दिल्या. रसेलच्या अखेरच्या षटकात १७ धावा करून RCB नं २ बाद १९४ धावांचे आव्हान उभे केले. एबीनं ३३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७३, तर विराटनं नाबाद ३३ धावा केल्या.  


प्रत्युत्तरात सर्वांचे लक्ष KKR कडून पदार्पण करणाऱ्या टॉम बँटनकडे होते, पण तो ८ धावांवर नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्य वॉशिंग्टन सुंदरनं KKRला दुसरा धक्का दिला. त्यानं नितिश राणाचा (९) त्रिफळा उडवला. सेट झालेला शुबमन गिलही धावबाद झाला. गिलनं २५ चेंडूंत ३४ धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिकला (१) युझवेंद्र चहलनं त्रिफळाचीत केलं. पुढच्याच षटकात सुंदरनं KKR च्या इयॉन मॉर्गनला (८) बाद केले. KKR चा निम्मा संघ ६४ धावांवर तंबूत गेला होता. सुंदरनं ४ षटकांत २० धावा देत २ विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेलनं १० चेंडूंत १६ धावा करून धावांचा आणि चेंडूंचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु उडानानं त्याला बाद केले. रसेलच्या विकेटसह KKR च्या विजयाच्या आशाही मावळल्या. KKR ला कसेबसे २० षटकांत ९  बाद ११२ धावांपर्यंत मजल मारता आली. RCBनं हा सामना ८२  धावांनी जिंकला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies