Type Here to Get Search Results !

IPL 2020 : DC vs CSK ; दिल्लीने केले ‘शिखर’ सर ; चेन्नईवर ५ गड्यांनी विजय साजरा ; अक्षरची ५ बॉलमध्ये २१ धावांची वादळी खेळी



IPL 2020 : DC vs CSK ; दिल्लीने केले ‘शिखर’ सर ; चेन्नईवर ५ गड्यांनी विजय साजरा ; अक्षरची ५ बॉलमध्ये २१ धावांची वादळी खेळी  


शारजाह : IPL 2020 : DC vs CSK  विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल ने चेन्नई विरुद्ध धावांचे ‘शिखर’ सर असून ५ गड्यांनी विजय साजरा केला. अखेरच्या अक्षरची ५ बॉलमध्ये २१ धावांची वादळी खेळी विजयासाठी कारणीभूत ठरली असली तरी सामन्याचे ठळक वैशिष्ट म्हणजे शिखर धवनचे वादळी शतक.


चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  दिल्ली कॅपिटल्सचा  गोलंदाज तुषार देशपांडे यानं पहिल्याच चेंडूंवर CSK ला धक्का देत कुरणला बाद केले. शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस  यांनी CSKला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या. नॉर्ट्झेनं ३६ धावा करणाऱ्या वॉटसनचा त्रिफळा उडविला. तर रबाडानं १५ व्या षटकात फॅफला बाद केले. फॅफनं ४७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. 




त्यानंतर आलेला धोनी (३) ही धावांवर आला तसा माघारी गेला. रायुडू व जडेजा यांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेताना पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रायुडू २५ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४५, तर जडेजा १३ चेंडूंत ४ षटकारांसह ३३ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईनं ४ बाद १७९ धावा केल्या.

 


प्रत्युत्तरात DC ची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ पहिल्याच षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अजिंक्य रहाणे (८) पुन्हा एकदा अपयशी ठरला. चहरनं त्यालाही माघारी पाठवले. आज चेन्नईच्या खेळाडूंनी शिखर धवनचे सोडलेले झेल चेन्नई सुपर किंग्सला महागात पडले. शिखर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी केली. ड्वेन ब्राव्होनं ही ६८ धावांची भागीदारी अय्यरला (२३) बाद करुन संपुष्टात आणली.


मार्कस स्टॉयनिसनं वाहत्या गंगेत हात धुत २४ धावा केल्या.  अॅलेक्स कैरीही ४ धावांवर झेलबाद झाला अन सामना पुन्हा चेन्नईच्या बाजूने झुकला. अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज असताना अक्षर पटेलनं तीन खणखणीत षटकार खेचत दिल्लीचा विजय पक्का करत ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला. धवन ५८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह १०१ धावांवर नाबाद राहिला, तर पटेलनं ५ चेंडूंत ३ षटकार खेचून २१ धावा केल्या.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies