Gas-Cylinder-Transport : गॅस सिलेंडर वाहतूकदारांच्या संपामुळे राज्यातील काही भागात गॅस सिलेंडरची टंचाई येणार? - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 6, 2020

Gas-Cylinder-Transport : गॅस सिलेंडर वाहतूकदारांच्या संपामुळे राज्यातील काही भागात गॅस सिलेंडरची टंचाई येणार?Gas-Cylinder-Transport : गॅस सिलेंडर वाहतूकदारांच्या संपामुळे राज्यातील काही भागात गॅस सिलेंडरची टंचाई येणार?


मनमाड :  मनमाड जवळच्या पानेवाडी ट्रर्मिनल येथिल इंडियन ऑईलच्या बॉटलिंग प्रकल्पातील स्थानिक वाहतूकदारांनी शनिवारपासून संप पुकारल्याने येथून राज्याच्या काही भागात होणारी गॅस सिलेंडर वाहतूक ठप्प झाली आहे. कंपनीने वाहतुकीचे टेंडर काढताना वेळोवेळी त्यात बदल केले. तिसऱ्या वेळी पुन्हा टेंडर काढले त्यात स्थानिक वाहतूकदारांना डावलण्यात आल्याने वाहतूकदारांनी हा संप पुकारला आहे.


मनमाड येथून उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या गावात इंण्डेन गॅस सिलेंडरचा पुरवठा ट्रकच्या माध्यमातून होत असतो. या वाहतुकीसाठी दरवर्षी कंपनीकडून वाहतूक दराचे टेंडर मागिले जाते. त्यानुसार वाहतुकीचे दर ठरविण्यात येतात. याही वेळेस सहा टायर आणि दहा टायर गाडीचे टेंडर मागविण्यात आले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक वाहतूकदारांकडे दहा टायरची गाडी नाही. त्यातच सहा टायर गाडीच्या टेंडरमध्ये बदल करण्यात आले आहेत. अधिकारी वाहतूकदारांना अपमानास्पद वागणूक देत असल्याने आणि टेंडरमध्ये स्थानिकांना डावलत बाहेरच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देत असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या स्थानिक वाहतूकदारांनी शनिवारपासून अचानक संपाचे हत्यार उपसल्याने मनमाड येथील इंडियन ऑईल गॅस प्रकल्पातून एकही वाहतूकदाराचा ट्रक गॅस सिलेंडर घेऊन बाहेर पडला नाही.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise