पालकमंत्री जयंत पाटील यांचा दिनांक १० व ११ रोजीचा सांगली जिल्हा दौरा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 9, 2020

पालकमंत्री जयंत पाटील यांचा दिनांक १० व ११ रोजीचा सांगली जिल्हा दौरापालकमंत्री जयंत पाटील यांचा दिनांक १० व ११ रोजीचा सांगली जिल्हा दौरा


सांगली : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील शनिवार, दि. 10 ऑक्टोबर 2020 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 


शनिवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता मुंबईहून इस्लामपूरकडे प्रयाण. रात्री इस्लामपूर येथे आगमन व कारखाना येथे मुक्काम. रविवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता इस्लामपूरहून सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता सांगली येथे आगमन व सांगली व मिरज येथील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ - वसंत कॉलनी संपर्क कार्यालय. दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे कोविड-19 आढावा बैठक. दुपारी 3.30 वाजता होनमारे व्हेंचर प्रा. लि. च्या नवीन पेट्रोल पंपाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती, स्थळ - म्हैसाळ. सायंकाळी 4.30 वाजता मिरज पूर्व भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा, स्थळ - म्हैसाळ. सायंकाळी 6 वाजता म्हैसाळहून सलगरे ता. मिरजकडे प्रयाण. सायंकाळी 7 वाजता सलगरे येथे आगमन व श्री. तानाजी पाटील यांच्या कोविड सेंटरला सदिच्छा भेट. रात्री सोयीनुसार इस्लामपूरकडे प्रयाण, इस्लामपूर (कारखाना) येथे आगमन व मुक्काम.


सोमवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कारखाना येथे विविध प्रतिनिधीसमवेत बैठका / भेटणे. सायंकाळी 7.30 वाजता इस्लामपूरहून मुंबईकडे प्रयाण.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise