Type Here to Get Search Results !

विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आटपाडी तालुका दौरा ; कोण-कोणत्या गावाला ते भेटी देणार पहा बातमी सविस्तर



विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आटपाडी तालुका दौरा ; कोण-कोणत्या गावाला ते भेटी देणार पहा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/धिरज प्रक्षाळे :  महाराष्ट्र विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार असल्याची माहिती आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य हर्षवर्धन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या वतीने आज पंचायत समिती विश्रामधाम येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेला माजी उपसभापती तानाजीशेठ यमगर, पंचायत समिती सदस्य दादासाहेब मरगळे, जेष्ठ नेते हरिभाऊ गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी, युवा नेते जयवंत सरगर, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.






असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

मंगळवार दिनांक 20 ऑक्टोंबर 2020 रोजी सायंकाळी 4.30 वा बाळेवाडी ता. आटपाडी येथे आगमन व अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी सायंकाळी 5 वा. आटपाडी येथून झरे गावकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वा झरे येथे आगमन, राखीव व मुक्काम.  


बुधवार दिनांक 21 ऑक्टोंबर 2020 सकाळी 9 वा झरे येथून शासकीय वाहनाने अनुसेमळा, माडगुळे, लेंगरेवाडी, तडवळे, करगणी, बनपूरी, मिटकी तलाव, करंजे येथे भेट. दुपारी 12 वा करंजे येथून खानापूर मार्गे पेड, ता. तासगावकडे प्रयाण. दुपारी 12.30  वा. पेड येथे आगमन व पेड, कवठेएकंद येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी. दुपारी 1 वा माधवनगर शासकीय विश्रामगृह, सांगली येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व जिल्हाधिकारी, कृषी अधिक्षक यांचेसमवेत चर्चा. दुपारी 3.30 वा पत्रकार परिषद, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. सायंकाळी 4 वा सांगली येथून शासकीय वाहनाने इस्लामपूरकडे प्रयाण. सायंकाळ 5 वा इस्लामपूर येथे आगमन व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानी भेट. सायंकाळी 6 वा इस्लामपूर येथून साताराकडे शासकीय वाहनाने प्रयाण.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies