तासगाव-कवठेमहांकाळ या दोन तालुक्यासाठी उपविभागीय महसूल कार्यालय सुरु करा ; या युवा नेत्याने केली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 13, 2020

तासगाव-कवठेमहांकाळ या दोन तालुक्यासाठी उपविभागीय महसूल कार्यालय सुरु करा ; या युवा नेत्याने केली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणीतासगाव-कवठेमहांकाळ या दोन तालुक्यासाठी उपविभागीय महसूल कार्यालय सुरु करा ; या युवा नेत्याने केली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे मागण  


तासगाव :  तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्यासाठी उपविभागीय महसूल कार्यालय करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी गृहमंत्री आर.आर. (आबा) पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.


महाराष्ट्र शासनाने तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्यासाठी महसूल विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सद्यस्थितीत अजून उपविभागीय कार्यालयाच्या कामास सुरुवात न झाल्याने नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. यासाठी दोन्ही तालुक्यासाठी उपविभागीय महसूल कार्यालय करण्यात यावे. अशी विनंती रोहित पाटील यांनी  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise