घरगुती गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली : पाहा सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 16, 2020

घरगुती गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली : पाहा सविस्तर

 


घरगुती गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली : पाहा  सविस्तर 


मुंबई : घरगुती गॅस सिलिंडर 'मिस्ड कॉल'द्वारे बुक करण्याच्या प्रणालीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी भक्कम पाऊल उचलले आहे. यापुढे सिलिंडर घरपोच हवा असल्यास ग्राहकांना नव्या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. या नव्या नियमानुसार गॅस वितरकाकडे तुमची अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला सिलिंडर घरपोच मिळणार नाही.
एलपीजी उत्पादन आणि वितरण करणाऱ्या कंपन्यांनी गॅस सिलिंडर वितरण प्रणाली आणखी पारदर्शक केली आहे. सध्या ही यंत्रणा प्रायोगिक तत्वावर जयपूरमध्ये राबवण्यात येत आहे. ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या नोव्हेंबरपासून १०० स्मार्ट सिटीजमध्ये नव्या प्रणालीनुसार गॅस वितरण केले जाणार आहे.भविष्यात ही प्रणाली देशभर लागू करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी गॅस वितरक एजन्सीकडे आपला मोबाईल क्रमांक , राहण्याचा पत्ता त्यासाठीचे पुरावे याची खात्री करावी. मोबाईल क्रमांक अपडेट नसल्यास किंवा राहण्याचा पत्ता अपूर्ण असल्यास गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. ही प्रणाली सध्या घरगुती गॅस सिलिंडरबाबत राबवण्यात येत आहे.सध्या केंद्र सरकारकडून घरगुती सिलिंडरवर अनुदान दिले जाते. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्यांकडून एलपीजी गॅसची निर्मिती आणि गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. कंपन्यांकडून जागतिक बाजारानुसार एलपीजी गॅस दराचा आढावा घेतला जातो. मुंबई, बंगळुरु सारखी मोजकी शहरांमध्ये पाईप गॅस पुरवठा केला जातो. ही मोजकी शहरे सोडली तर देशातील गॅसचा मोठा ग्राहक वर्ग आजही गॅस सिलिंडरचा वापर करतो. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत दारिद्रय रेषेखालील महिलांना ५ कोटी गॅस सिलिंडर मोफत पुरवले जाणार आहेत. कंपन्यांकडून घरपोच सिलिंडरसाठी DAC (डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड) ही प्रणाली विकसित केली आहे. ज्यात ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड पाठवला जाणार आहे. जेव्हा डिलिव्हरी बॉय सिलिंडर घेऊन येईल तेव्हा ग्राहकाला तो डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड शेअर करावा लागेल. तो मॅच झाल्यानंतरच तुम्हाला सिलिंडरची डिलिव्हरी मिळेल, असे कंपन्यांनी म्हटलं आहे.जर तुमचा मोबाईल क्रमांक किंवा राहण्याचा पत्ता गॅस वितरकाकडे अद्ययावत नसेल आणि तुम्ही सिलिंडरची नोंदणी केली असेल तर डिलिव्हरी बॉयकडील मोबाइल ऍपमध्ये तुम्ही तुमची माहिती अद्ययावत करू शकतात.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise