'शट अप या कुणाल' मध्ये पुढच्या पाहुण्या सुप्रिया सुळे? - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 13, 2020

'शट अप या कुणाल' मध्ये पुढच्या पाहुण्या सुप्रिया सुळे?

 'शट अप या कुणाल' मध्ये पुढच्या पाहुण्या सुप्रिया सुळे?


मुंबई :  प्रसिद्ध स्टॅण्ड कॉमेडियन कुणाल कामराने 'शट अप या कुणाल' या पॉडकास्टमध्ये नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली. त्यानंतर कुणालने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता 'शट अप या कुणाल' या पॉडकास्टमध्ये पुढच्या पाहुण्या सुप्रिया सुळे असतील अश्या चर्चा रंगल्या आहेत.


दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील खारमधील एका स्टुडिओमध्ये कुणाल कामरा यांनी घेतलेल्या संजय राऊत यांच्या मुलाखतीचं चित्रीकरण पार पडलं. लवकरच सोशल मीडियावर या मुलाखतीचं प्रक्षेपण होईल. या मुलाखतीचं चित्रीकरण पार पडल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबरला कुणाल कामराने खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यामुळे आता सुप्रिया सुळे आणि कुणाल कामरा यांची भेटही चर्चेचा विषय ठरत आहे. जर कुणाल कामरा सुप्रिया सुळेंची मुलाखत घेणार असेल तर त्यामध्ये कोणते विषय असतील याचीही उत्सुकता आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise