तलवारीची भाषा कशासाठी? मंत्री विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 10, 2020

तलवारीची भाषा कशासाठी? मंत्री विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवालतलवारीची भाषा कशासाठी? मंत्री विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल


मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलचं गरम झाले असतानाच सरकारने समाजाच्या काही मागण्या मान्य केल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले. यामध्ये मराठा समाजाची प्रमुख असलेली  MPSC परीक्षा रद्द करण्यात आली.  


मराठा मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. यावेळी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. खासदार संभाजीराजे यांच्या या वक्तव्याला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


राजा रयतेचा असतो… समाजाचा नसतो, तलवार कुणा विरोधात उपसणार? तलवारीची भाषा का? तडजोडीची भाषा असली पाहिजे. असा थेट सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता संभाजीराजे छत्रपतींना विचारला आहे.

हे ही वाचा : योजना माडगुळे प्रादेशिक पिण्याच्या पाण्याची, त्रास मात्र आटपाडीतील नागरिकांना : राजेंद्र खरात ; अन्यथा विरोधात आंदोलन करणार

शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले; मग हे राजकारण कशासाठी, असा प्रश्न यावेळी विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. एका समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये. ओबीसीविरोधात, दलितविरोधात, तलवारीची भाषा कशासाठी, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.


एमपीएससी परीक्षेत २०० जागा आहेत. त्यात २३ जागा ह्या मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय जात, लग्नाचे प्रश्न असतात. माझी भूमिका विचारली तर परीक्षा व्हावी असे माझे मत आहे. पण त्यात कोणत्याही समाजाचे नुकसान व्हावं अस नाही. मध्य मार्ग काढता येतो, मग हे राजकारण कशाला? शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले आहेत. एक समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise