धनगर समाजाने धनगर नेत्यांच्या मागे का ऊभे राहावे..? - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 3, 2020

धनगर समाजाने धनगर नेत्यांच्या मागे का ऊभे राहावे..?धनगर समाजाने धनगर नेत्यांच्या मागे का ऊभे राहावे..?

माणदेश एक्सप्रेस टीम


म्हसवड/अहमद  मुल्ला :  राज्यातील लोकसंख्येत दोन क्रमांकाचा  समाज म्हणून धनगर समाजाकडे पाहीले जाते. परंतु समाजाचे नेते विखुरलेले आहेत, ते या समाजाच्या जिव्हाळ्याच्या आरक्षण प्रश्नासाठी एकत्र यायला तयार नाहीत त्यामुळे आता समाजाला हा प्रश्न पडला आहे की या नेत्यांना प्रश्न सोडवायचा आहे की चिघळत ठेवायचा आहे? समाजाची फसवणूक नेमक कोण करतय? सरकार की समाजाचे नेते? असा सवाल धनगर समाजातील अशोक माने, डॉ.संदीप घुगरे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केला आहे.


स्वर्गीय बी.के.कोकरे पासुन आतापर्यंत आरक्षणासाठी खुप आंदोलने झाली परंतु नेते काही या प्रश्नावर एकत्र येतच नाहीत. आजच्या घडीला समाजाचे मंत्री, माजी मंत्री, आमदार माजी आमदार व विविध राजकीय पक्षाचे काही नेतेही आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासुन धनगर समाजाला आरक्षणापासुन वंचित ठेवले गेले आहे. समाजाच्या जीवन मरणाचा प्रश्न असतानाही सतत राजकारण केले जात आहे. भिक दिल्यासारखे सत्तेचा तुकडा राजकीय पक्ष देत आहेत.


अनेक नेते काही या प्रश्नावर एकत्र येत नाहीत. आजच्या घडीला आण्णासाहेब डांगे, गणपतराव देशमुख, विकास महात्मे, अनिल गोटे, प्रकाश शेंडगे, राम शिंदे, दत्ता भरणे, गोपीचंद पडळकर, रामहरी रूपनवर, रामराव वडकुते, महादेव जानकर, हरिदास  भदे, विश्वासराव देवकाते, सुरेश कांबळे, रमेश शेंडगे, आण्णाराव पाटील, आनंदराव पाटील, शिवाजीराव दळणर, शशिकांत तरंगे, राम गावडे, बाळासाहेब गावडे आणि इतर युवा नेते ही आहेत. या सर्वांनी आपला इगो बाजुला ठेऊन या प्रश्नावर एकत्र यावे ही समस्त महाराष्ट्रातील धनगर समाजाची मागणी आहे. परंतु या नेत्याचा इगो आडवा येतो, तसेच यांचे राजकीय पक्षाचे बोलवते धनी आडवे आहेत.  

आता समाजाने हे नेते जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत धनगर समाजाने यांच्या मागे ऊभे राहाणे बंद करावे, आणि आरक्षणासाठी समाजीने स्वतंत्र लढा उभा करण्याचा प्रयत्न करावा.  मग हे सर्व नेते एका जाग्यावर येतील. काही नेते सांगतातात आरक्षणाची अंमलबजावणी करा तर काही सांगतात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी. ती तर याअगोदर केली होतीच की ती का परत घेतली हे समाजाला कळले पाहीजे. आणि केंद्र सरकारने आरक्षण लागू करावे. तर काही सांगतात राज्य शासनाने आध्यादेश काढावा, तर काहीजण विरोध करतातात परंतु जर आरक्षण घटनेनेच दिलेले  आहे व ते इतर राज्यातील धनगर समाजाला लागू झालेले आहे मग महाराष्ट्र राज्य सरकार राज्यघटनेची अंमलबजावणी का करत नाही...? हा सामान्य धनगर समाजाला पडलेला हा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नावर नेते फसवतात की सरकार  धनगर  समाजाला फसवत आहे?  तेच धनगर समाजाला कळेना झाले आहे.


संपूर्ण समाजाला गोंधळात टाकुन काही राजकीय मंडळी आपला स्वार्थ साधत आहेत. धनगड व धनगर हा प्रश्न मिटला असताना काहीजण मुद्दामहून तो विषय चघळत आहेत आणि समाजाला संभ्रमात टाकत आहेत. पण आता समाजाला कळतय कोण खरा आणि कोण लबाड आहे ते. असा प्रश्न ही या प्रसिध्दी पत्रकात केला असुन संदिप काळे (मुंबई) , विष्णू गोरे (लातुर), प्रकाश खाडे (अहमदनगर), गणेश कोकरे (पुणे), आबा बंडगर (पुणे), बाबासाहेब माने (सातारा), संतोष वाघमोडे (सांगली), रोहीत पांढरे  (पुणे), जगदीश वीर (पैठण), प्रकाश देवकाते (बारामती) व इतर सामान्य धनगर समाज बांधव यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
No comments:

Post a Comment

Advertise