विठ्ठलापूर येथील शासकीय जागेत धनदांडग्यांनी केले अतिक्रमण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 1, 2020

विठ्ठलापूर येथील शासकीय जागेत धनदांडग्यांनी केले अतिक्रमणविठ्ठलापूर येथील शासकीय जागेत धनदांडग्यांनी केले अतिक्रमण 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील मौजे विठ्ठलापूर येथील शासकीय जागेत गावातीलच धनदांडग्या लोकांनी अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात जागा बळकावली आहे. याबाबत अमित ऐवळे, निलेश भंडारे यांनी आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देवून सदरचे अतिक्रमण तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे.


मौजे विठ्ठलापूर हद्दीत भवानीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात शासनाची गायरान जमीन आहे. याच जमिनीवर गावातीलच जमीनदार व धनदांडग्या लोकांनी अतिक्रमण करून जमीन लाटण्याचा सपाटाच लावला आहे. सदर जागेमध्ये दगडांचे व पत्र्याचे शेड व सिमेंटचे पोल उभा करून जागा धरून अतिक्रमण करणे चालू आहे.  


तरी प्रशासनाने सदरचे अतिक्रमण काढून टाकावे नाहीतर संपूर्ण शासकीय जागा धनदांडग्यांच्या हातात जावून शासनाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सदर निवेदनाच्या प्रती आटपाडीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक आटपाडी यांना देण्यात आल्या आहेत.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise