विमान प्रवास करायचा आहे ; तर चला, कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरु - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 27, 2020

विमान प्रवास करायचा आहे ; तर चला, कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरुविमान प्रवास करायचा आहे ; तर चला, कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरु  


कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिकांना विमानात बसण्याची मोठी हौस असते. परंतु विमानप्रवास म्हणजे मोठा खर्चिक असा भ्रम सर्वसामान्य नागरिकांचा असतो. परंतु ज्यांना सांगली व कोल्हापूर येथून मुंबईला जायचे आहे त्यांच्यासाठी कोल्हापूर ते मुंबई अशी विमानसेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे.कोल्हापूर-मुंबई विमानसेवा मंगळवार, बुधवार, गुरुवार अशी आठवड्यातून तीन दिवस ही सेवा असेल, असे विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया व ट्रू जेट कंपनीचे व्यवस्थापक रणजितकुमार यांनी सांगितले.लॉकडाऊनमध्ये बंद झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा तब्बल सात महिन्यांनंतर सुरू होत आहे. ही सेवा लवकर चालू करण्यात यावी, अशी मागणी उद्योजक, व्यापारी तसेच विविध औद्योगिक संघटनांकडून होत होती. Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise