Type Here to Get Search Results !

विवेक राहाडे आत्महत्या प्रकरण : ती सुसाइड नोट बनावट ; पोलिस तपासातून आली माहिती समोर



विवेक राहाडे आत्महत्या प्रकरण : ती सुसाइड नोट बनावट ; पोलिस तपासातून आली माहिती समोर


बीड : विवेक राहाडे नावाच्या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. विवेकची सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. पण, ती सुसाइड नोट विवेकने लिहिलीच नसल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासून समोर आली आहे.


बीड तालुक्यातील केतूरा गावात राहणाऱ्या विवेक राहाडे या 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. यावेळी एक सुसाइड नोट आढळून समोर आली होती. यामध्ये ‘मी विवेक कल्याण राहाडे एक कष्टकरी आणि गरिब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जिवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मी आताच नीट मेडिकलची परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे नंबर लागत नाही.


माझ्या घरच्यांची मला प्राव्हेटमध्ये शिकवण्याची ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलाची किंव येईल आणि माझे मरण सार्थक होईल’ असा मजकूर लिहिला होता. ही सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती.


पण पोलिसांनी या सुसाइड नोटचा नीट तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. ही सुसाइड विवेकने लिहिलीच नव्हती. विवेकच्या मृत्यूचा फायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाईड नोट तयार करून ती सोशल मीडियाद्वारे व्हायरल करण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies