Type Here to Get Search Results !

दादागिरीच्या जोरावर गोरगरिबांच्या अन्नात माती कालवणार असाल,तर खपवून घेणार नाही ; आमदार पडळकर यांचा राष्ट्रवादी ला इशारा



दादागिरीच्या जोरावर गोरगरिबांच्या अन्नात माती कालवणार असाल,तर खपवून घेणार नाही ; आमदार पडळकर यांचा राष्ट्रवादी ला इशारा  


मंगळवेढा :  ज्यावेळी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येते, त्या वेळी त्यांची दादागिरी चालते. पण, दादागिरीच्या जोरावर गोरगरिबांच्या अन्नात माती कालवणार असाल, तर हे महाराष्ट्रात खपवून घेणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे उसतोड मजूर, मुकादम यांच्या बैठकीत ते बोलत होते.


यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, की, वाहतूक कंत्राटदाराकडून कारखानदारांनी कोरे चेक घेऊन त्यांची पिळवणूक करतात. त्यामुळे कायद्याने त्यांना संरक्षण मिळावे. तसेच मागील 20 टक्के फरक मिळावा. ऊसतोड मजूर व बैलाचा विमा उतरवला जावा. बैलाच्या वैद्यकीय खर्चाची व्यवस्था कारखानदारांनी करावी. कारखानदारांकडून काटामारी होत असल्याने ऊसतोड केलेल्या मजुरांना त्याचे मोल मिळत नाही. त्यामुळे कारखानदारांकडून होणारी काटामारी थांबवावी.

 


राज्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र वाढल्याने कारखानदार मागे लागले आहेत. परंतु ज्यावेळी उसाचे क्षेत्र कमी असतो. त्यावेळी करारासाठी त्यांच्या मागे लागूनही ते विचारात नाहीत. सध्या अनेक मजूर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आले आहेत. जोपर्यंत मजुरीत वाढ करण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत मजुरांनी हातात कोयता घेऊ नये. असे आवाहन ही त्यांनी केले.

 


जे कारखानदार दादागिरीच्या जीवावर ऊसतोडणी मजूर व वाहतूकदारावर दबाव टाकून कारखाने चालू करतील. त्यांच्या विरोधात ठाण मांडू असा इशारा देत (स्व.) गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर व वाहतूक संघटनेच्या वतीने राज्यभरात केलेल्या कोयता बंद आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले. यावेळी माऊली हळदणकर, बापू मेटकरी, धनाजी गडदे, बंडू करे, तानाजी गरंडे धोंडाप्पा करे, दादासाहेब मदने आदी मान्यवर उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies