केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 10, 2020

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कारकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


पाटणा : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय कायदा आणि विधि मंत्री रविशंकर प्रसाद अंत्यसंस्कारावेळी केंद्र उपस्थित राहणार आहेत. पासवान यांचं पार्थिव आज दुपारी 12.30 वाजता त्यांच्या पाटण्यातील निवासस्थान कृष्णा पुरी वरुन जनार्दन घाट (दीघा) इथं आणलं जाईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  


रामविलास पासवान यांचं पार्थिव शरीर शुक्रवारी रात्री पाटण्याला नेण्यात आलं. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. पाटण्यात  विधानसभा आणि पार्टी ऑफिसमध्ये पासवान यांना श्रद्धांजली अर्पित केली गेली.   


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. गुरुवारी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं. दिल्लीतील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी 74 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


1 comment:

  1. माणदेश एक्सप्रेस म्हणजे अलीकडच्या काळातील एक चांगला आणि विश्वासनीय वृत्तपत्र आहे.

    ReplyDelete

Advertise