गळवेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, October 4, 2020

गळवेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंगगळवेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : गळवेवाडी ता. आटपाडी. जि.सांगली येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रमोद संभाजी ढेरे व प्रकाश विद्याधर सावंत या दोघांविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरचा प्रकार हा दिनांक २५/०९/२०२० रोजी दुपारी दोन वाजता गळवेवाडी शाळेजवळ घडला. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 13 वर्षीय मुलगी चुलत बहीणीला तिच्या तिच्या घरी सोडून परत जात असताना आरोपी प्रमोद ढेरे व प्रकाश सावंत यांनी मुलीचा हात धरून शाळेत नेऊन विनयभंग केला. यावेळी सदर मुलीने आरडाओरडा केला असता सदरचा प्रकार कोणास सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली.  


सदर घटनेबाबत मुलीच्या आईने आरोपींना जाब विचारला असता पोलीस ठाणेस तक्रार दिल्यास आरोपींनी तिला ही बघून घेण्याची धमकी दिली होती. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise