यावर्षीचा खरसुंडी येथील दसरा व नवरात्र उत्सव स्थगित - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 13, 2020

यावर्षीचा खरसुंडी येथील दसरा व नवरात्र उत्सव स्थगित यावर्षीचा खरसुंडी येथील दसरा व नवरात्र उत्सव स्थगित  


आटपाडी/प्रतिनिधी : खरसुंडी येथील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र खरसुंडी ता. आटपाडी जि. सांगली येथील यंदाचा प्रसिद्ध दसरा व नवरात्र उत्सव शनिवार दि. १७ ऑक्टोंबर ते दि. २६ ऑक्टोंबर २०२० या कालावधीत नियोजित होता.  

 

 परंतु या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट खरसुंडी मार्फत कळविण्यात येते की, श्रीक्षेत्र खरसुंडी येथील यंदाचा दसरा व नवरात्र उत्सव साजरा होणार नाही. केवळ मुख्य मंदिरातील मूर्तीची पूजा व नित्योपचार मर्यादित स्वरुपात करण्यात येणार आहेत.याव्यतिरिक्त पालखी सोहळा हरजागर तसेच विजयादशमीचा साखर वाटप सोहळा अथवा इतर कोणताही गर्दी जमवणारा उत्सव होणार नाही.

 

 या दसरा नवरात्र कालावधीत श्री सिद्धनाथ मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहील. मंदिराची सर्व दरवाजे बंद असल्यामुळे भाविकांनी येण्याचा प्रयत्न करू नये अथवा दर्शनासाठी आग्रह करू नये अशी विनंती ट्रस्टतर्फे केली असून कोविड १९ चा प्रादुर्भाव आणि मंदिर बंदच्या शासकीय आदेशानुसार सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.  

 

  समस्त भाविक, सेवेकरी, मानकरी आदींनी याची नोंद घ्यावी व श्रीनाथ देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise