मला आणि माझ्या मुलांना बेडुक म्हणतो हा माणूस? हा माणूस पुळचट आहे : नारायण राणे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 26, 2020

मला आणि माझ्या मुलांना बेडुक म्हणतो हा माणूस? हा माणूस पुळचट आहे : नारायण राणेमला आणि माझ्या मुलांना बेडुक म्हणतो हा माणूस? हा माणूस पुळचट आहे : नारायण राणे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण म्हणजे निर्बुद्ध बरळणं होतं अशी खोचक टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी केली आहे.मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो, आमच्यासारख्या शिवसैनिकांनी त्यावेळी शिवसेना उभी केली. केसेस आम्ही अंगावर घेतल्या, स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणाला कानाखाली तरी दिली आहे का? काल दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेलं भाषण शिवराळ होती. एका मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. वाघाची भाषा करणारा हा शेळपट माणूस आहे. शेण आणि गोमुत्राची भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही. मातोश्रीच्या आतल्या गोष्टी आम्ही बाहेर काढल्या तर कपडे घेऊन पळायची वेळ येईल असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.


४७ शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. त्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कोणत्याही योजना, करोनाचं संकट याबाबत काहीही भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं नाही. मुख्यमंत्र्यांना काय बोलावं कसं बोलावं हे अजून कळत नाही. मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस लायकच नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. करोनामुळे महाराष्ट्रात ४३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण? असाही प्रश्न नारायण राणे यांनी विचारलं आहे.

महाराष्ट्राशी बेईमानी करुन हा माणूस मुख्यमंत्री झाला. ५६ जागा मिळाल्या तरीही मुख्यमंत्री झालात कारण सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. मोदींचं नाव घेऊन निवडणूक जिंकली आणि सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. सुशांतप्रकरणी स्वतःच्या मुलाला क्लिन चीट दिली. मात्र सुशांतने आत्महत्या केलेली नाही. सुशांतचा खूनच झाला आहे याप्रकरणी एक दिवस आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार आहे. मला आणि माझ्या मुलांना बेडुक म्हणतो हा माणूस? हा माणूस पुळचट आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise