तृतीय पंथीयाची युवक काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 29, 2020

तृतीय पंथीयाची युवक काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड
तृतीय पंथीयाची युवक काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड

माणदेश एक्सप्रेस टीम  आटपाडी : राजकिय पक्षामध्ये आप आपल्या पक्षाची बाजू राजकारणात मांडण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रवक्ता असतो तो त्याच्या मार्फत प्रत्येक पक्षाची बाजू ठळकपणे मांडता येते. त्यासाठी त्याचे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावे लागते.यासाठी महिला व पुरुष या दोघांनाही संधी मिळते मात्र युवक काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी यावेळी प्रथमच तृतीय पंथीयाची निवड करण्यात आली असून युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही निवड केली असून सारंग पुणेकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे आमदार धिरज देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.याबाबत आमदार धिरज देशमुख यांनी ट्वीट केले आहे. यामध्ये ते म्हणतात. तृतीय पंथीय समूहातून येणाऱ्या सारंग पुणेकर यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी वंचितांसाठी भरीव काम केले आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा! सत्यजित तांबे आपण घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण आहे.परंतु तृतीयपंथी समुहातून येवून प्रदेश प्रवक्ते पदी झालेले सारंग पुणेकर हे काही पहिलेच तृतीयपंथी नाहीत तर या अगोदर वंचित बहुजन आघाडीने दिशा पिंकी शेख यांना ती संधी दिली होती. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीनंतर युवक काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड झालेले सारंग पुणेकर हे दुसरे आहेत.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise