इंडियन ऑइलतर्फे देशभरात इंडेन घरगुती गॅस सिलिंडर नोंदणीसाठी एकच कॉमन क्रमांक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 30, 2020

इंडियन ऑइलतर्फे देशभरात इंडेन घरगुती गॅस सिलिंडर नोंदणीसाठी एकच कॉमन क्रमांक


 


इंडियन ऑइलतर्फे देशभरात इंडेन घरगुती गॅस सिलिंडर नोंदणीसाठी एकच कॉमन क्रमांक


मुंबई: सणासुदीच्या दिवसात देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी इंडियन ऑइलतर्फे आणखी एक पुढाकार घेत इंडेन घरगुती गॅस सिलिंडर नोंदणीसाठी एक कॉमन नंबर जारी केला आहे. आता ग्राहक 7718955555 या क्रमांकावर गॅस सिलिंडरची नोंदणी करू शकतील. ग्राहकांसाठी ही सुविधा 24×7 उपलब्ध असेल.
या क्रमांकावर SMS किंवा IVRS च्या माध्यमाने LPG सिलिंडर नोंदणी करता येऊ शकेल. ग्राहकांसाठी ही मोठी सोय झाली असून इंडेन LPG रिफील सिलिंडर नोंदणी करणे आता अधिक सोपे आणि सोयीचे झाले आहे. ग्राहक कोणत्याही राज्यात किंवा टेलिकॉम सर्कलमध्ये असले तरी त्यांचा इण्डेन रिफील नोंदणी क्रमांक हा तोच राहणार आहे.सध्या अस्तित्वात असलेली वेग-वेगळ्या टेलिकॉम सर्कलसाठी वेगळ्या इंडेन रिफील नोंदणी क्रमांकाची योजना 31.10.2020 च्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी LPG रिफील नोंदणीसाठी एकच कॉमन क्रमांक 7718955555 हा असेल.ग्राहक केवळ त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून इंडेन LPG रिफील बुक करू शकतात. LPG रिफील बुक करण्याची सुधारित पद्धती आणि मोबाईल नोंदणी खालील प्रमाणे आहे.


(1) जर ग्राहकांचा मोबाईल क्रमांक इंडेन रेकॉर्डमध्ये आधीच नोंदणी केलेला असेल तर IVRS द्वारा एक 16 अंकी ग्राहक ओळख क्रमांक मिळेल. हा 16 अंकी ग्राहक ओळख क्रमांक ग्राहकांच्या इण्डेन LPG बिल नोंदला असेल याची दखल घ्यावी. ग्राहकांनी हे निश्चित केल्यावरच रिफील बुकिंग स्वीकारले जाईल.


(2) जर ग्राहकांचा मोबाईल क्रमांक इंडेन रेकॉर्ड मध्ये नसेल तर त्यांनी त्यांचा 7 आकड्याने सुरु होणारा 16-अंकी ग्राहक ओळख क्रमांक टाकून वन टाईम रजिस्ट्रेशन द्वारे मोबाईल नोंदणी करून घ्यावा. ह्याच्या सोबतच त्याच IVRS कॉलवर त्याचे अधिप्रमाणन करून घ्यावे. हे केल्यानंतर ग्राहकांचा मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली जाईल आणि LPG रिफील बुकिंग स्वीकार होईल. हा 16 अंकी ग्राहक ओळख क्रमांक ग्राहकांच्या इंडेन LPG बिला वर नोंदला असेल याची दखल घ्यावी.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise