शेंडगेवाडीच्या रस्त्याची अवस्था बिकट ; पुलाशेजारी रस्ता वाहून गेला ; निवडणुकीवर बहिष्कार घालूनही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 13, 2020

शेंडगेवाडीच्या रस्त्याची अवस्था बिकट ; पुलाशेजारी रस्ता वाहून गेला ; निवडणुकीवर बहिष्कार घालूनही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोपशेंडगेवाडीच्या रस्त्याची अवस्था बिकट ; पुलाशेजारी रस्ता वाहून गेला ; निवडणुकीवर बहिष्कार घालूनही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील व आटपाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या शेंडगेवाडी गावाला जाण्यासाठी बनपुरी येथून एकमेव रस्ता असून या रस्ता मार्गावरून वाहणाऱ्या ओढ्यावरील पुलाशेजारील रस्ता वाहून गेल्याने शेंडगेवाडी नागरिकांची अवस्था अजूनही बिकट झाली आहे.


आटपाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या व बनपुरी गावाशेजारी असणाऱ्या शेंडगेवाडी गावाला जाण्यासाठी बनपुरी गावातून रस्ता जातो. याच रस्त्यावर गाव ओढा असून याठिकाणी जाण्यासाठी पुल बांधण्यात आला आहे. परंतु दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पुलाच्या बाजूला असणारा रस्ता वाहून गेला. त्यामुळे याठिकाणीहून शेंडगेवाडीला जाण्यासाठी चारचाकी गाडी जावू शकत नाही.


शेंडगेवाडी नागरिकांनी हाच रस्ता तयार करून मिळावा म्हणून विधानसभेच्या निवडणुकीसाठी बहिष्कार घातला होता. परंतु आजतागायत रस्ता काही झालाच नाही. तर जो तो तोही रस्ता पडलेल्या पावसाने वाहून गेल्याने बंद झाल्याने शेंडगेवाडीतील नागरिकांची अवस्था “ना घर का ना घाट का” अशी झाली आहे.


निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही एक ही काम नाही. गावाला रस्ता, स्मशानभूमी, तसेच इतर  कामावर सरकारचे दुर्लक्ष आहे. ग्रामस्थांनी सरपंच ते दोन्ही आमदारांना कल्पना देऊन यांचे दुर्लक्ष आहे. यांच्या दूर्लक्षितपणामुळे येथील जनतेची अतिशय गैरसोय झाली आहे.  

सोमनाथ शेंडगे

ग्रामस्थ शेंडगेवाडी 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise